Thursday, July 03, 2025 10:37:49 AM

हृद्यद्रावक ! अंत्यसंस्काराहून परतताना काळाचा घाला

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंत्यसंस्काराहून परतताना एक भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या चितेगाव रोडवरील आर एल स्टील कंपनीच्या समोर दुचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात

हृद्यद्रावक  अंत्यसंस्काराहून परतताना काळाचा घाला

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंत्यसंस्काराहून परतताना एक भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या चितेगाव रोडवरील आर एल स्टील कंपनीच्या समोर दुचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता कि, यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, कय्युम मुंशी कुरैशी, संतोष प्रल्हाद पवार, दोघेजण जागीच ठार झाले तर आकाश पुंडलिक पवार आणि  उमेश देवरे हे दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरकडुन पैठणकडे अंत्यसंस्कार आटोपून घरी येत असलेल्या पैठण कडुन छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या वाहनांनी एकमेकांना  धडक दिल्याने २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

यासंदर्भात बिडकीन पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान अंत्यसंस्काराहून परतत असतांना हा अपघात घडल्याने परिसरात  तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अपघातग्रस्तांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. 


सम्बन्धित सामग्री