लातूर: लातूर जिल्ह्यात वीज विभागाच्या मनमानी कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. येथे वीज विभागाने संपूर्ण गावाला वीज चोरीसाठी दंड आकारला आहे. वीज विभागाचे कर्मचारी रीडिंग घेण्याऐवजी स्वतःहून बिले बनवत आहेत. गावातील अनेक लोकांचे बिल एक लाखांपेक्षा जास्त आले आहे. तथापी, वीज बिलात स्पष्टपणे लिहिलेले आहे की वीज चोरीसाठी एका ग्राहकाकडून किती पैसे वसूल केले जात आहेत. महाराष्ट्र राज्य वीज विभागाने 50 हजार ते सुमारे दीड लाखांपर्यंतचे वीज बिल पाठवून ग्रामस्थांना धक्का दिला आहे.
काय आहे नेमक प्रकरण?
खरं तर लातूर जिल्ह्यातील रामलिंग मुदगड गावात ही घटना घडली आहे. येथे ग्रामस्थांना 50 हजार ते दीड लाखांपर्यंतचे वीज बिल पाठवण्यात आले आहे. वीज बिलाच्या या रकमेमुळे ग्रामस्थ नाराज असून संताप व्यक्त करत आहेत. राज्य वीज विभागाने 50 हजार ते सुमारे दीड लाखांपर्यंतचे वीज बिल पाठवून या ग्रामस्थांना धक्का दिला आहे.
हेही वाचा - वैजापूरमध्ये महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून हत्या
तथापी, हजारो बिल भरणाऱ्या गावकऱ्यांना वीज चोर म्हटले आहे. यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य वीज विभागाने रामलिंग मुदगड गावातील सुमारे 200 वीज ग्राहकांना वीज चोरी प्रकरणी दंड ठोठावला आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, वीज वापरात नसताना इतक्या मोठ्या रकमेचे बिल कसे आले. याशिवाय, महाराष्ट्र राज्य वीज विभागाने इतक्या मोठ्या रकमेचे वीज बिल भरताना वीज चोरी केल्याचा उल्लेख केल्याने ग्रामस्थांनी याचा निषेध व्यक्त केला आहे.
हेही वाचा - माजी आमदार राजा राऊत यांच्या चिरंजीवाचा शिव्या देतानाचा व्हिडीओ वायरल
गावकऱ्यांकडून बीज बिल कमी करण्याची मागणी -
दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज विभागाने ग्रामस्थांच्या या तक्रारींकडे लक्ष द्यावे आणि मीटर रीडिंगनुसार बिल द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. राज्य वीज विभागाने या प्रकरणात अद्याप आपली बाजू मांडलेली नाही. आता ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून महाराष्ट्र राज्य वीज विभाग या वाढलेल्या वीज बिलाबद्दल काय निर्णय घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.