विजय चिडे; प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मोसंबीचे माहेर घर म्हणून सर्वदूर नावलौकिक पैठण प्रसिद्ध व गोड रसेली मोसंबीला मगरी रोगाचा फटका बसणार आहेत. मोसंबीच्या बागांना मगरी रोग पडला असल्याने फळांची गळ वाढलीय. तर दुसरीकडे मोसंबीच्या दरात घसरण झाली त्यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडण्याची वेळ आलीय. पैठण तालुका हा मोसंबी उत्पादनात मोठ्या प्रमाणात अग्रेसर आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मोसंबी फळबागांची लागवड करून उत्पन्नाचे स्वप्न उराशी बाळगून आहे. तालुक्यामधील 10 हेक्टर क्षेत्रावर मोसंबी लागवड असून त्यापैकी 8 हजार हेक्टरवरील क्षेत्रावरती मोसंबी उत्पादन देणारी आहे. मात्र, तालुक्यातील मोसंबीच्या फळावर मगरी रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे.
हेही वाचा: धक्कदायक बातमी: पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 14 हरणांचा मृत्यू
यंदा या मोसंबीला तेरा ते आठरा हजार रुपये टन कवडीमोल भाव आहे. त्यातच आता मगरी या रोगाने मोसंबी वरती मोठ्या प्रमाणात आक्रमण केल्याने मोसंबीच्या फळांची मोठ्या प्रमाणात गळ होऊ लागली आहे. याचा शेतकरी वर्गाला मोठा अर्थिक फटका बसला आहे. शेतकरी सततचा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, जाणवत गेलेली भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी यावर मात करत गत अनेक वर्षांपासून जोपासलेल्या फल बागातून भरपूर उत्पन्न मिळेल अशी आशा मोसंबी उत्पादक बाळगून राहते. यंदा पावसाळा सुरू होऊन तब्बल दिड महिना झाले तरी परिसरात एक ही जोरदार पाऊस झाला नाही. गेल्या महिनाभर परिसरात ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडत असल्याने मोसंबी, डाळिंब बागांना मगरी रोगाने ग्रासल्याने बागेतील अर्धे अधिक फळे गळून पडली आहेत. फळगळ प्रचंड प्रमाणात वाढली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा पावसाचा खंड पडल्यामुळे मोसंबीच्या फळाची गळती सुरू झाले आहे. मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी जमिनीमध्ये तापमान वाढल्याने मोसंबी ला याचा फटका बसला आहे. जुलैच्या सुरुवातीला मोसंबीला चांगला भाव असल्या कारणांमुळे व्यापाऱ्यांने शेतकऱ्यांची मोसंबी 15 हजार रूपये ते 19 हजार रूपये या भावाने मोसंबी खरेदी केली आहे. मात्र आज तीच मोसंबी 12 हजार रूपये टनांने दिल्ली सह आदी बाजारपेठ विक्री होत असल्याने व्यापारीही वर्गही संकटात सापडले आहेत.
हेही वाचा: बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना सरकारकडून दिलासा; मंत्री सरनाईकांची मोठी घोषणा
चौकट- मोसंबीच्या फळबागेवर मगरी रोग पडल्याने शेतकरी धास्तावले असून औषध फवारणी करून देखील प्रादुर्भाव कमी होत नसल्याने कृषी विभागाने मार्गदर्शन करावे व फळगळ झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना अर्थिक मदत करावी व मोसंबीच्या बागेवर डास,डाग देखील झाले त्यामुळंही मोसंबीच्या फळ खराब होतं असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तरी शासनाने तालुक्यात त्वारित मोसंबीचा फळबाग विमा मंजूर करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.