बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. पालकमंत्रिपद स्विकारल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा होता. जिल्हा नियोजन समितीची बैठक आटपून त्यांनी विविध प्रश्नांसाठी प्रशासकीय बैठकही घेतली. यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
'विकासकामात खंडणी मागितल्यास मकोका लागणारच'
बीड दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. बीड आवादा कंपनीचे खंडणी प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. यावर बोलताना विकासकामात खंडणी मागितल्यास मकोका लागणारच असा आक्रमक पवित्रा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
हेही वाचा : प्रवासी विमान लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकले
‘चुकीचं वागलं तर कार्यवाही होणारच’
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणाच वाल्मिक कराड पोलिस कोठडीत आहे. कराड हा धनंजय मुंडेचा माणूस आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांचाही हात असल्याच्या टीका वारंवार धस, क्षीससागर यांच्याकडून केल्या जात आहेत. तसेच मंत्री मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असंही त्यांच्याकडून बोलले जात आहे. यावर अजित पवारांनी त्यांची भूमिका मांडली होती. जर धनंजय मुंडे या प्रकरणात सापडले तरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पवारांनी सांगितले होती. आज बीड दौऱ्यावेळी मी तुमच्या जवळचा असेल तरीही चुकीचं वागू नका. चुकीचं वागलं तर कार्यवाही होणारच असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : महाकुंभात इंटरनेटवर व्हायरल होणारी मोनालिसा चित्रपटात भूमिका साकारणार
अजित पवारांनी काय सूचना केल्यात?
विकासाची कामं करताना खंडणी मागू नका. काम करताना जातपात पाळणारा माणूस नाही. जिल्ह्यात दर्जेदार काम झालंच पाहिजे. गैरव्यवहार आढळले तर थेट मकोकाच लागणार आहे. वेडंवाकडं काम सहन करणार नाही. बीडच्या पहिल्याच बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पवार यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. बीडचा पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा आलोय. पराभव झाला तरी खचू नका. तथ्य असल्यास कारवाई होणारच असा थेट इशारा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांनी दिला.