मुंबई : भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होवू शकलो,याचा मला अभिमान आहे असे सांगत हिंदू धर्मच टिकला नाही तर जात कशी टिकणार? जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहणार आहे. जो धर्माच्या विरोधात जाईल, त्याचं काही खरं नाही, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. त्याच्या या विधानानंतर राजकीय वादाला नवं तोंड फुटलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
गुलाबराव पाटील यांच्या विधानानंतर राशपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी धर्म कोणाची मालमत्ता नसल्याची बोचरी टीका केली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महायुतीच्या नेत्यांना घरचा आहेर दिला आहे. मानवधर्म हा संपूर्ण जगामध्ये महत्त्वाचा आहे. माणसाला माणसाप्रमाणे जगवलं पाहिजे हाच सर्वात मोठा धर्म आहे असा टोला त्यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला आहे.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल राऊतांनी केला गौप्यस्फोट
भगवे एका बाजूला होते आणि बाकी सर्व एका बाजूला होते. मला माझ्या धर्माचा अभिमान आणि गर्व आहे असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील. धर्म आणि भगवा झेंडा याच्यावर कायम एकनिष्ठ राहा असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. गुलाबराव पाटलांच्या विधानांमुळे सर्वत्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
गुलाबराव पाटील यांच्या या विधानांमुळे आता राजकीय वर्तुळात या नव्या वादावर चर्चा सुरू झाल्या आहेत.