कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण स्थानकाजवळ नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे, ज्यामुळे कोकणवासीयांच्या प्रवासाचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. या कामामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळेत फेरफार होईल आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागेल.
शुक्रवारी चिपळूण स्थानकावर पॅसेंजर लूप लाईन 3 कार्यान्वित करण्यासाठी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे रत्नागिरी-दिवा पॅसेंजर (गाडी क्र. 50104) आणि लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस (गाडी क्र. 12202) यांसारख्या गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होईल.रत्नागिरी – दिवा पॅसेंजर गाडी रत्नागिरी स्थानकावरून पहाटे 5.35 ऐवजी सकाळी 7 वाजता उशिराने सुटणार आहे. याशिवाय, लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी रत्नागिरी ते चिपळूण विभागादरम्यान काही वेळ थांबवण्यात येईल.
कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या आणि जात असलेल्या सर्व गाड्यांच्या वेळेत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणवासीयांनी रेल्वे प्रवासाची तयारी करतांना वेळापत्रकाची तपासणी करणे आवश्यक आहे.
या ब्लॉकचे काम केवळ एक दिवसाचा आहे, पण त्याचे परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर दीर्घकालीन असू शकतात.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.