UPI New Rules: गुगल पे, फोनपे, पेटीएम द्वारे यूपीआय करणाऱ्यांसाठी 1 एप्रिलपासून नियम बदलणार आहेत. अलीकडेच, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI शी जोडलेले ते मोबाईल नंबर बँक खात्यातून काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत, जे बराच काळ सक्रिय नाहीत. जर तुमचे बँक खाते अशा मोबाईल नंबरशी जोडलेले असेल जो सक्रिय नसेल तर ते UPI अकाउंट डिलीट केले जाईल. यानंतर तुम्हाला UPI पेमेंट करण्यात समस्या येऊ शकते. NPCI ने बँका आणि UPI अॅप्सना दर आठवड्याला डिलीट केलेल्या मोबाईल नंबरची यादी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे 1 एप्रिलनंतर, निष्क्रिय मोबाइल नंबर बँकिंग प्रणालीतून काढून टाकला जाणार आहे.
सायबर फसवणुकीचा धोक्यामुळे घेण्यात आला निर्णय -
दररोज सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता एनपीसीआयने हा निर्णय घेतला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचे म्हणणे आहे की जे मोबाईल नंबर आता वापरात नाहीत म्हणजेच जे सक्रिय नाहीत ते बँकिंग आणि UPI सिस्टीममध्ये तांत्रिक समस्या निर्माण करत आहेत. जर टेलिकॉम ऑपरेटर्सनी हे नंबर दुसऱ्याच्या नावाने जारी केले असतील तर यामुळे फसवणुकीचा धोका वाढू शकतो.
हेही वाचा - Vodafone Idea ने भारतात सुरू केली 5G सेवा! सध्या 'या' शहरातील लोकांनाचं मिळणार लाभ
UPI पेमेंट करण्यासाठी, मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे खूप महत्वाचे आहे. UPI पेमेंट करताना मोबाईल नंबर हे ओळखण्याचे साधन आहे. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही पैसे देता तेव्हा मोबाईल नंबर खात्री करतो की पैसे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचत आहेत. जर एखादा नंबर सक्रिय नसेल आणि तो दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आला असेल, तर पेमेंट अयशस्वी होण्याची किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी खात्यात पोहोचण्याची शक्यता असते.
हेही वाचा - एआयमुळे गुन्हेगारीला आळा बसणार
मोबाईल नंबर सक्रिय करा -
जर तुमच्या कोणत्याही बँक खात्याशी असा मोबाईल नंबर लिंक केलेला असेल जो आता सक्रिय नाही किंवा तुम्ही तो बराच काळ रिचार्ज केलेला नसेल, तर तुम्हाला तुमच्या टेलिकॉम सेवा प्रदात्यांकडून (जियो, एअरटेल, व्हीआय, बीएसएनएल) खात्री करावी लागेल की हा नंबर तुमच्या नावावर सक्रिय आहे की नाही. जर नंबर सक्रिय नसेल तर तुम्ही तो ताबडतोब सक्रिय करा किंवा तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाइल नंबर बदलावा.