Sunday, May 18, 2025 08:58:14 PM

UPI मध्ये मोठा बदल: ‘हे’ फिचर हटवण्याची तयारी, काय परिणाम होणार?

UPI डिजिटल व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांचं लक्ष असल्यानं फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. यामुळे NPCI नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे.

upi मध्ये मोठा बदल ‘हे’ फिचर हटवण्याची तयारी काय परिणाम होणार
UPI मध्ये मोठा बदल: ‘हे’ फिचर हटवण्याची तयारी, काय परिणाम होणार?

देशभरात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे UPI चा वापर झपाट्यानं वाढत आहे. किराणा दुकानदार, भाजीवाले, ऑनलाइन सेवा देणारे आणि मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वजण UPI च्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. पण या डिजिटल व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांचं लक्ष असल्यानं फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या सुरक्षेसाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे. UPI मधील Pull Transaction प्रकार हटवण्याच्या दृष्टीनं NPCI बँकांशी चर्चा करत आहे.

UPI व्यवहार प्रामुख्यानं दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे, Push Transaction आणि दुसरं म्हणजे, Pull Transaction. Push Transaction म्हणजे ग्राहक स्वतः QR कोड स्कॅन करून किंवा UPI आयडी टाकून पैसे पाठवतो. हा व्यवहार ग्राहकाच्या नियंत्रणाखाली असतो आणि तुलनेने अधिक सुरक्षित मानला जातो. पण दुसरा जो Pull Transaction प्रकार आहे. यात व्यापारी किंवा सेवा प्रदाता ग्राहकाला पैसे भरण्यासाठी विनंती म्हणजे Payment Request पाठवतो. ग्राहक ही विनंती स्वीकारल्यास त्याच्या खात्यातून पैसे कापले जातात. अनेक वेळा फसवणुकीसाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.

हेही वाचा -  Google Pay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो लक्ष द्या! 1 एप्रिलपासून 'या' मोबाईल नंबरवर UPI चालणार नाही

NPCI च्या निरीक्षणानुसार, UPI फसवणुकीच्या बहुतांश घटना Pull Transaction च्या माध्यमातून घडतात. त्यामुळं NPCI हे फिचर हटवण्यासाठी बँकांशी चर्चा करत आहे. जर Pull Transaction बंद झाल्यास ग्राहकांची डिजिटल फसवणूक होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटेल, असा अंदाज आहे. तसंच सायबर गुन्हेगार फेक पेमेंट रिक्वेस्ट पाठवून ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रमाण कमी होईल. यानं UPI व्यवहार आणखी सुरक्षित होतील आणि ग्राहकांचा विश्वास वाढेल.

हेही वाचा -  Vodafone Idea ने भारतात सुरू केली 5G सेवा! सध्या 'या' शहरातील लोकांनाचं मिळणार लाभ

दरम्यान, NPCI ने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. तरी हा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. भारतात डिजिटल पेमेंटमध्ये UPI सर्वाधिक वापरले जाते. फेब्रुवारी 2024 मध्येच UPI व्यवहारांची संख्या 16 अब्जच्या वर गेली आणि एकूण व्यवहार मूल्य 21 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. RBI देखील ग्राहकांच्या डिजिटल फसवणुकीबाबत सतर्क असून जागरूकता मोहीम राबवत आहे. 2024-25 च्या पहिल्या सहामाहीत कर्ज आणि डिजिटल पेमेंटशी संबंधित तक्रारी 70 टक्के पेक्षा जास्त होत्या. त्यामुळे UPI व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी NPCI आणि RBI नवे नियम लागू करण्याच्या तयारीत आहेत.


सम्बन्धित सामग्री