Explosion of old ammunition in Indonesia प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image
जकार्ता: इंडोनेशियातील पश्चिम जावा प्रांतात एक मोठा अपघात झाला आहे. जुन्या आणि निरुपयोगी दारूगोळ्याची विल्हेवाट लावताना मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 4 सैनिकांसह किमान 13 जणांचा मृत्यू झाला. लष्करी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, इंडोनेशियन लष्कराचे सदस्य गरुत जिल्ह्यातील सागरा गावात असलेल्या लष्करी साठवण केंद्रात साठवलेल्या जुन्या, निरुपयोगी आणि कुचकामी दारूगोळ्याची विल्हेवाट लावत होते. दारूगोळा जुना झाल्यावर किंवा अयोग्यरित्या साठवला गेला तर तो शक्तिशाली राहत नाही. या कारणास्तव त्यांची वेळोवेळी विल्हेवाट लावली जाते.
हेही वाचा - भारतानंतर आता 'या' देशात भयानक दहशतवादी हल्ला! जिहादींनी 100 हून अधिक लोकांची केली हत्या
इंडोनेशियन लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल क्रिस्टोमी सियानातुरी यांनी सांगितले की, पहिला स्फोट झाल्यानंतर लगेचच दुसरा स्फोट झाला. या घटनेत नऊ नागरिक आणि चार लष्करी कर्मचारी ठार झाले. तथापि, जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेची चौकशी सुरू असून दारूगोळा विल्हेवाट लावताना मानक प्रक्रियांचे पालन केले गेले आहे का? ते पाहिले जात असल्याचे सियानातुरी यांनी यावेळी नमूद केले.
हेही वाचा - Earthquake In Pakistan: पाकिस्तान भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला! 'किती' होती भूकंपाची तीव्रता? जाणून घ्या
प्राप्त माहितीनुसार, पश्चिम जावामधील हे ठिकाण रिकामे असून निवासी क्षेत्रांपासून दूर आहे. येथे अनेकदा दारूगोळा टाकला जातो. अशा प्रकारच्या क्रियांमुळे जवळपासच्या रहिवाशांचे लक्ष वेधले जाते, जे ग्रेनेड आणि मोर्टारमधून धातूचे तुकडे, तांबे किंवा लोखंडाचे अवशेष गोळा करतात. स्फोटाच्या फुटेजमध्ये स्फोटानंतर काही वेळातच आकाशात प्रकाश आणि दाट काळा धूर दिसून आला.