Thursday, July 03, 2025 11:21:20 AM

New Passport Rules: पासपोर्ट बनवायचा आहे? सरकारने बदललेत नियम; आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्य

Indian Passport Rules: परराष्ट्र मंत्रालयाकडून परदेश प्रवासासाठी पासपोर्ट दिला जातो. भारत सरकारने पासपोर्ट बनविण्याचे नियम बदलले आहेत. बदललेल्या नव्या नियमानुसार खालील कागदपत्रे लागणार आहेत.

new passport rules पासपोर्ट बनवायचा आहे सरकारने बदललेत नियम आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्य

Indian Passport Rules 2025: पासपोर्ट एक महत्वाचे डॉक्युमेंट आहे. परराष्ट्र मंत्रालयामार्फत परदेश प्रवासासाठी पार्सपोर्ट जारी केला जात असतो. पासपोर्ट हा ओळखपत्रासह तुमचं नागरिकत्व सिद्ध करणारा महत्त्वाचा पुरावा आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट हा आपल्या नागरिकत्वाचा आणि वैयक्तिक माहितीचा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. अन्य देशांत प्रवास करण्यासाठी पासपोर्ट अनिवार्य असतो. नुकतेच केंद्र सरकारने पासपोर्टच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. पासपोर्ट नियम, 1980 या नियमावलीत या आठवड्यात बदल करण्यात आले आहेत. नवीन नियम अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर लागू होतील. चला, जाणून घेऊया हे नवे नियम...

हेही वाचा - Jaya Kishori : जया किशोरी म्हणाल्या, 'रावण रेपिस्ट होता, ब्रह्मदेवाने दिलेल्या 'या' शापामुळे नाईलाजने त्याने सीतेला स्पर्श…'

पासपोर्टसाठी नवीन नियम काय आहेत?
1. जन्म दाखला/ जन्मप्रमाणपत्र (Birth Certificate)
केंद्र सरकारच्या सुधारित नियमांनुसार आता 1 ऑक्टोबर 2023 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना पासपोर्टसाठी अर्ज करताना जन्मदाखला देणे अनिवार्य करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, महानगरपालिका किंवा जन्म-मृत्यू नोंदणी कायदा, 1969 अंतर्गत कोणत्याही तत्सम प्राधिकरणाकडूनच जन्म दाखला वितरित केलेला असावा. विशेष म्हणजे 1 ऑक्टोबर 2023 पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना हा नियम लागू होत नाही. या व्यक्ती पूर्वीप्रमाणेच एसएससी बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, वाहन चालक परवाना किंवा इतर तत्सम सरकारी ओळखपत्राचा पुरावा सादर करू शकतात. याशिवाय, हे लोक कोणतेही छायाचित्र असलेले सरकारी कागदपत्र, ज्यावर जन्म तारीख असेल, तेही सादर करू शकतात.

2. निवासाचा पत्ता
आजवर पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पासपोर्ट धारकाचा कायमचा पत्ता छापलेला असायचा. पण यापुढे शेवटच्या पानावर पत्ता छापला जाणार नाही. त्याऐवीज तिथे बारकोड छापला जाईल. इमिग्रेशन अधिकारी हा बारकोड स्कॅन करून पत्त्याबाबत माहिती मिळवू शकतील.

3. पत्त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत
पत्त्याचा पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्रांमध्ये पाणी बिल, लँडलाइन किंवा पोस्टपेड मोबाईल बिल, वीज बिल, निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र, गॅस कनेक्शनचा पुरावा, जोडीदाराच्या पासपोर्टची प्रत, अल्पवयीन मुलाच्या पासपोर्टच्या बाबतीत पालकांच्या पासपोर्टची प्रत, बँक खात्याचे पासबुक आणि पासपोर्ट सेवा ऑनलाइन पोर्टलनुसार, आधार कार्ड प्रदान केल्याने पासपोर्ट अर्जांची प्रक्रिया जलद होईल.

4. कलर कोडींग
यापुढे पासपोर्टचे कव्हर वेगवेगळ्या रंगाचे असेल. जेणेकरून त्यांचे वर्गीकरण करणे सोपे जाईल. सरकारी अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट दिला जाईल. तसेच मुत्सद्दी अधिकाऱ्यांना (डिप्लोमॅट) लाल रंगाचा पासपोर्ट दिला जाईल. दरम्यान सामान्य नागरिकांना पूर्वीप्रमाणेच निळ्या रंगातला पासपोर्ट मिळेल. त्यामुळे विमानतळावरील कर्मचारी किंवा इमिग्रेशन ऑफीसरना तपासणी करताना सोपे जाणार आहे.

5. पालकांची नावे हटविली
पासपोर्टच्या शेवटच्या पानावर छापले जाणारे पालकांचे नाव यापुढे छापले जाणार नाही. या बदलामुळे एकल पालक किंवा विभक्त कुटुंबांना दिलासा मिळणार नाही. त्यांना जाहीर करावी न लागणाऱ्या माहितीबाबत गोपनीयता राखता येणार आहे.

6. पासपोर्ट सेवा केंद्राची संख्या वाढवली
पासपोर्टसाठी अर्ज करणे, मजकूरात बदल करणे, अशी कामे पासपोर्ट सेवा केंद्राद्वारे केली जातात. आता ही केंद्रे वाढवली जाणार आहेत. पुढील पाच वर्षांत सेवा केंद्रांची संख्या 442 वरून 600 केली जाणार आहे. यामुळे अर्जदारांच्या सुरक्षा, दक्षता आणि सुविधेत वाढ होणार आहे.

हेही वाचा - 'महिलेने पुरूषावर केलेला प्रत्येक आरोप खराच आहे, असं मानता येणार नाही,' उच्च न्यायालय म्हणाले, 'हल्ली निष्पाप लोकांना अडकवण्याची…'


सम्बन्धित सामग्री