Friday, December 13, 2024 12:06:02 PM

Ashish Shelar
'आदित्य, हिंमत असेल तर चर्चेला या'

धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत शिउबाठाचे आदित्य हे कधी स्वतः तर कधी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना पुढे करुन दिशाभूल करणारी माहिती देत आहेत आणि तथ्यहीन आरोप करत आहेत; - आशिष शेलार

आदित्य हिंमत असेल तर चर्चेला या

मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत शिउबाठाचे आदित्य हे कधी स्वतः तर कधी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना पुढे करुन दिशाभूल करणारी माहिती देत आहेत आणि तथ्यहीन आरोप करत आहेत; असा आरोप मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. शेलार यांनी आदित्य यांना हिंमत असेल तर चर्चेला या असे आव्हान दिले आहे. धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर चर्चेसाठी या असे आव्हान आशिष शेलार यांनी आदित्य यांना दिले आहे. आदित्य हे शहरी नक्षलवाद्यांच्या हातचे बाहुले बनून जे त्यांना हवे आहे ते बोलत किंवा वागत आहे; असाही आरोप आशिष शेलारांनी केला.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo