Saturday, June 28, 2025 10:24:38 AM

कौतुकास्पद! जागतिक मान्यता रेटिंग सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी जगात पहिल्या क्रमांकावर

मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांसारख्या नेत्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे.

कौतुकास्पद जागतिक मान्यता रेटिंग सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी जगात पहिल्या क्रमांकावर
Edited Image

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ख्याती आता भारतातचं नव्हे तर जगभरात दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्थान जागतिक स्तरावर सतत वाढत आहे. एका आंतरराष्ट्रीय एजन्सीने केलेल्या जागतिक मान्यता रेटिंग सर्वेक्षणात, पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांसारख्या नेत्यांना मोठ्या फरकाने मागे टाकले असून पहिला क्रमांक पटकावला आहे. तथापी, या सर्वेक्षणानुसार, संपूर्ण जग अमेरिका आणि चीनपेक्षा भारताच्या नेतृत्वावर जास्त विश्वास ठेवते. 

दरम्यान, अमेरिकन एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणात, पंतप्रधान मोदींनी केवळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकले नाही तर इतर अनेक जागतिक नेत्यांनाही मागे टाकले आहे. ऑपरेशन सिंदूर थांबवल्यानंतर 48 दिवसांनी आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मान्यता रेटिंगमध्ये, नरेंद्र मोदी 78 टक्के रेटिंगसह जगातील अव्वल नेते आहेत. दुसरीकडे, भारताकडून पराभव पत्करल्यानंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना फक्त 32 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे.

डोनाल्ड ट्रम्पपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींची जास्त ख्याती - 

तथापी, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या देशात फक्त 41 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. पंतप्रधान मोदी भारतात 11 वर्षे सतत सरकार चालवत आहेत आणि आता सत्तेच्या 12 व्या वर्षाकडे वाटचाल करत आहेत. असे असूनही, ते सतत अव्वल रेटिंगवर आहेत. तर, मोदींच्या तुलनेत, इतर जागतिक नेते खालच्या क्रमांकावर आहेत. 78 टक्के मान्यता रेटिंगसह मोदी आजही जगातील नंबर वन नेते आहेत. 

हेही वाचा - पंतप्रधान मोदी 2 जुलैपासून 'या' 5 देशांना देणार भेट! ब्रिक्स परिषदेला लावणार हजेरी

डोनाल्ड ट्रम्प यांची मान्यता रेटिंग  - 

इस्रायल-इराण युद्धानंतर डोनाल्ड ट्रम्प सर्वात वाईट मान्यता रेटिंगवर पोहोचले आहेत. अमेरिकेव्यतिरिक्त, आता ऑस्ट्रेलियाच्या लोवी इन्स्टिट्यूटने जागतिक शक्ती आणि जागतिक नेत्यांच्या केलेल्या सर्वेक्षणातून हे स्पष्ट झाले आहे की मोदी हे नंबर 1 जागतिक नेते आहेत. जागतिक शक्ती आणि जागतिक नेत्यांपासून ते संरक्षण आणि सुरक्षेपर्यंत, सर्वत्र मोदींचा आलेख वाढला आहे.

हेही वाचा - ऐकावं ते नवलचं! न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीला पठ्ठ्याने चक्क टॉयलेट सीटवर बसून लावली हजेरी; व्हिडिओ व्हायरल

जगाचा अमेरिकापेक्षा भारतावर जास्त विश्वास - 

याशिवाय, लोवी इन्स्टिट्यूट 2015 च्या सर्वेक्षणात देखील जगाने अमेरिकेपेक्षा भारतावर जास्त विश्वास असल्याचं म्हटलं आहे. तथापी, जेव्हा लोकांना विचारण्यात आले की जगात जबाबदारीने वागण्यात अमेरिकेवर तुमचा किती विश्वास आहे, तेव्हा फक्त 36 टक्के लोकांनी अमेरिकेला पाठिंबा दिला. भारताच्या संदर्भात जेव्हा हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा 54 टक्के लोकांचे मत होते की भारत जगात जबाबदारीने वागून आपली भूमिका बजावू शकतो. तसेच या सर्वेक्षणात फक्त 20 टक्के लोकांनी चीनला पाठिंबा दिला. 
 


सम्बन्धित सामग्री