Smishing Text Scam: अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ने आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांना एक इशारा जारी केला आहे. सायबर गुन्हेगारांनी मेसेजिंगद्वारे फसवणूक करण्याची एक नवीन पद्धत शोधून काढली आहे ज्याला Smishing म्हणतात. एफबीआयने वापरकर्त्यांना स्मिशिंग टेक्स्ट मेसेजेसपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. एफबीआयच्या मते, अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये, हे संदेश वापरकर्त्यांना फसवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. एफबीआयने आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांना इशारा दिला आहे की, जर त्यांना कोणताही संशयास्पद संदेश मिळाला तर त्यांनी तो त्वरित डिलीट करावा. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
Smishing Texts म्हणजे काय?
सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांची फसवणूक करण्यासाठी Smishing मजकूर संदेश वापरतात. असे संदेश वापरकर्त्यांना चुकीची माहिती पाठवतात. ही माहिती डिलिव्हरी किंवा बिल पेमेंटशी संबंधित असू शकते. मेसेजद्वारे, वापरकर्त्यांच्या बँक खात्यातील पैसे सायबर गुन्हेगारांच्या खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायबर गुंडांनी सुमारे 10,000 डोमेन नोंदणीकृत केले आहेत. याद्वारे ते लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवू शकतात.
हेही वाचा - Urban Company Launch Insta Maid Service: काय सांगता! आता फक्त 15 मिनिटांत तुमच्या घरी पोहोचणार मोलकरीण; अर्बन कंपनीने सुरू केली 'इंस्टा मेड्स' सेवा
स्मिशिंगद्वारे सायबर गुन्हेगारी -
दरम्यान, अशा घोटाळ्यांचा उद्देश केवळ पैसे चोरणे नसून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती आणि ओळख मिळवणे देखील आहे. या घोटाळ्यात, सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी बनावट मजकूर संदेश पाठवतात. सहसा मेसेजमध्ये बिल पेमेंट किंवा डिलिव्हरी असे शब्द वापरले जातात. यासोबतच, जर लवकर पैसे दिले नाहीत तर दंड देखील भरावा लागेल, असा इशाराही देण्यात येतो. या प्रकारचा संदेश सामान्य दिसतो, पण त्यात एक लिंक असते जी बनावट वेबसाइटकडे घेऊन जाते. या वेबसाइटवर वापरकर्ता जे काही पेमेंट करतो ते थेट सायबर गुंडांच्या खात्यात पोहोचते.
हेही वाचा - Deepseek नंतर, चीनने नवीन AI Assistant Manus केले लाँच; काय आहे याची खासियत? जाणून घ्या
वापर्कत्यांनी 'अशी' घ्यावी काळजी -
जर तुम्हाला असा कोणताही संशयास्पद संदेश मिळाला तर ताबडतोब त्याची तक्रार करा. मेसेजमध्ये पाठवलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. कोणतेही बिल किंवा इतर पेमेंट करण्यासाठी, नेहमी अधिकृत वेबसाइटवर जाऊन करा.