Thursday, July 03, 2025 01:47:34 PM

Tea making tips : परफेक्ट चहा बनवायचा आहे? मग आधी दूध टाकायचं की पाणी, जाणून घ्या योग्य पद्धत!

Tea making tips चहा हा भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कोणी कडक चहा पसंत करतो तर कोणी सौम्य. पण चहा बनवताना आधी दूध घालावे की पाणी हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे.

tea making tips  परफेक्ट चहा बनवायचा आहे मग आधी दूध टाकायचं की पाणी जाणून घ्या योग्य पद्धत
परफेक्ट चहा बनवायचा आहे? मग आधी दूध टाकायचं की पाणी, जाणून घ्या योग्य पद्धत!

Tea making tips : आपण भारतीयांना वेळेला चहा लागतो. असं म्हणा ना, चहा हा भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळच्या आल्हाददायक क्षणांपासून ते दिवसभराच्या थकव्यापर्यंत, चहा आपल्याला नेहमीच सोबत करतो. प्रत्येक घरात चहा बनवला जातो पण त्याचा स्वाद मात्र वेगवेगळा असतो. कोणी कडक चहा पसंत करतो तर कोणी सौम्य. पण चहा बनवताना आधी दूध घालावे की पाणी हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. ही साधी वाटणारी बाब चहाच्या चवेला मोठा बदल घडवू शकते. 

चहा बनवताना पाणी आणि दूध यांची योग्य क्रमवारी ठरवणे महत्त्वाचे आहे. यात चहा बनवण्याच्या दोन पद्धती प्रचलीत आहेत. त्यातील एक म्हणजे, आधी पाणी गरम करून चहा बनवणे. ही सर्वाधिक प्रचलित आणि पारंपरिक पद्धत आहे. यात प्रथम एका भांड्यात पाणी गरम केले जाते. पाणी उकळल्यानंतर त्यात चहा पत्ती घालून काही वेळ उकळले जाते. यानंतर त्यात साखर आणि दूध मिसळले जाते. हा प्रकार मुख्यतः त्यांना आवडतो जे कडक आणि फ्लेवर्सने भरलेला चहा पसंत करतात. या पद्धतीमुळं चहा पत्ती पाण्यात व्यवस्थित मुरते आणि तिचा पूर्ण फ्लेवर मिळतो. तसेच चहाचा रंग गडद होतो. पण यात जर दूध जास्त वेळ उकळले गेले तर चहाचा स्वाद काहीसा जडसर किंवा आंबटसर लागू शकतो. उकळण्याच्या वेळेचे योग्य संतुलन न राखल्यास चहा कडसर होऊ शकतो.

हेही वाचा -  Women's Day 2025: महिलेकडे असावेत 'हे' शानदार 5 कापड!

आता दुसरी पद्धत पाहुयात. यात काही लोक चहा करताना प्रथम दूध उकळतात आणि त्यात पाणी, चहा पत्ती आणि साखर घालतात. यामुळे चहा सौम्य आणि हलकासा लागतो. या पद्धतीमुळं दूधाची चव अधिक गोडसर आणि मऊ होते. चहा अधिक क्रिमी आणि हलका लागतो. ज्यांना दूधाची चव जास्त हवी आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. पण यात दूध आधी उकळल्यास ते फाटण्याची शक्यता असते. तसंच या पद्धतीमुळं चहा पत्तीचं फ्लेवर पूर्णपणं निघत नाही, त्यामुळं चहा फिकट पडू शकतो.

हेही वाचा -  Cockroach Milk: झुरळाचे दूध गाईच्या दुधापेक्षा 3 पट जास्त पौष्टिक! शास्त्रज्ञांनी केला आश्चर्यकारक खुलासा 

चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती?
चहा तयार करण्याची कोणतीही योग्य किंवा चुकीची पद्धत नाही. हा पूर्णतः व्यक्तिगत आवडीचा प्रश्न आहे. पण चहा तज्ञ आणि अनुभवी चहा प्रेमींच्या मते, प्रथम पाणी उकळणे आणि नंतर दूध घालणे ही अधिक योग्य पद्धत आहे. यामुळे चहा पत्तीचा फ्लेवर पूर्णपणे निघतो आणि चहाची चव अधिक समतोल राहते.


सम्बन्धित सामग्री