Sunday, May 04, 2025 03:21:19 AM

प्रभादेवी पूल आजपासून बंद; रात्री 9 वाजल्यापासून वाहतूक करता येणार नाही

मुंबईतील प्रभादेवी पूल आज रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून हा पूल तोडून नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.

प्रभादेवी पूल आजपासून बंद रात्री 9 वाजल्यापासून वाहतूक करता येणार नाही

मुंबई : मुंबईतील प्रभादेवी पूल आज रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून हा पूल तोडून नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून, तो शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टरचा महत्त्वाचा भाग आहे. पुलाचा वापर करून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी वाहतूक मार्गाची सोय करण्यात आली आहे. 

परळ व प्रभादेवी परिसरास जोडणारा महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत हा पूल तोडून नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार असून तो शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टरचा महत्त्वाचा भाग आहे. एल्फिन्स्टन ब्रिजवरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येणार असून ती इतर मार्गाने वळविण्यात येणार आहे. यामध्ये एल्फिन्स्टन पुलाचा वापर करून पूर्व पश्चिम दिशांना जाणाऱ्या वाहनांना पर्यायी वाहतूक मार्गाची सोय करण्यात आली आहे. तसेच काही मार्ग एकेरी करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी नो पार्किंग झोन घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा : पाकड्यांचा कायमचा इलाज कसा करायचा ?

असे आहेत पर्यायी मार्ग 

दादर पूर्वेकडून पश्चिमकडे आणि दादर मार्केटकडे जाणाऱ्या वाहनांना टिळक ब्रीजचा वापर करता येणार आहे. तर, परळ पूर्वेकडून प्रभादेवी आणि लोअर परळकडे जाणारी वाहने करी रोड ब्रीजचा वापर करतील.

परळ, भायखळा पूर्वकडून 3 प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी-लिंकच्या दिशेने जाणारी वाहने चिंचपोकळी ब्रीजचा वापर करतील.

प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परळला, टाटा रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालय येथे जाणाऱ्या वाहनांना दुपारी 3 ते रात्री 11 या कालावधीत करी रोड ब्रीजचा वापर करता येणार आहे.


सम्बन्धित सामग्री