Sunday, July 13, 2025 09:49:29 AM

इस्रायलचा इराणच्या अणु तळ आणि क्षेपणास्त्र कारखान्यावर हवाई हल्ला; संरक्षण मंत्रालयासह सर्व काही उद्ध्वस्त

गुरुवारी रात्री इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्रायली सैन्याने 60 लढाऊ विमानांचा वापर केला.

इस्रायलचा इराणच्या अणु तळ आणि क्षेपणास्त्र कारखान्यावर हवाई हल्ला संरक्षण मंत्रालयासह सर्व काही उद्ध्वस्त
Edited Image

तेहरान: गुरुवारी इराणने इस्रायलविरोधात युद्धाची घोषणा केली. त्यानंतर इस्त्रायलने इराणविरोधात अधिक कडक भूमिका घेतली आहे. गुरुवारी रात्री इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्रायली सैन्याने 60 लढाऊ विमानांचा वापर केला. इस्रायली हवाई दलाने एक्स अकाउंटवर केलेल्या पोस्टद्वारे सांगितले आहे की, त्यांनी इराणचे अणु तळ, संरक्षण मंत्रालय आणि इतर अनेक महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त केले आहेत.

हेही वाचा - इराणने अधिकृतपणे इस्रायलविरोधात युद्ध केले जाहीर; खामेनी यांनी दिली एक्स पोस्टवर माहिती

तेहरानवर इस्त्रायलचे अनेक हवाई हल्ले  - 

इस्रायली हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गुरुवारी रात्री तेहरानमधील डझनभर लष्करी तळांवर 60 हून अधिक हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे 120 अत्यंत विध्वंसक बॉम्ब टाकण्यात आले. या दरम्यान, इस्रायली सैन्याने इराणची क्षेपणास्त्रे, कच्चा माल बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक, इंजिन, कारखाने आणि उत्पादन स्थळे नष्ट केली.

हेही वाचा - 'आता संपूर्ण जग काय घडतयं ते पाहिल...'; इराणने रुग्णालयावर हल्ला केल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांचे मोठे वक्तव्य

हवाई हल्ल्यात इराणचे क्षेपणास्त्र तळ, संरक्षण मंत्रालय उद्ध्वस्त -

इस्त्रायलने म्हटलं आहे की, सैन्याने इराणी संरक्षण मंत्रालयावर हवाई हल्ला केला. याशिवाय, तेहरानमध्ये असलेल्या स्पँड मुख्यालयाच्या इमारतीवरही हल्ला करण्यात आला. इस्रायली हवाई दलाने प्राणघातक हल्ल्यात इराणची रडार प्रणाली देखील नष्ट केली आहे. इस्रायली लढाऊ विमानांनी इस्फहान आणि तेहरान भागात असलेल्या इराणी क्षेपणास्त्र आणि रडार प्रणालींवर हा प्राणघातक हल्ला केला. 
 


सम्बन्धित सामग्री