Wednesday, June 04, 2025 10:20:22 AM

मतदान करण्यासाठी आवश्यक कागदपत्र

ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही अशांसाठी महाराष्ट्राच्या माहिती संचलनालयाने ओळखीचा पुरावा म्हणून बारा पर्यायी कागदपत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.

मतदान करण्यासाठी आवश्यक कागदपत्र

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी तसेच लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पात्र असलेल्या मतदारांना हक्क बजावता येईल. मतदान करण्यासाठी पात्र मतदारांना निवडणूक अधिकाऱ्याला योग्य ते कागदपत्र दाखवावे लागेल. यानंतर निवडणूक अधिकारी मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देईल. 

पात्र मतदारांना निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र दिले आहे. ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही अथवा असलेले मतदार ओळखपत्र गहाळ झाले आहे किंवा वापरण्यायोग्य स्थितीत नाही अशांसाठी महाराष्ट्राच्या माहिती संचलनालयाने ओळखीचा पुरावा म्हणून बारा पर्यायी कागदपत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. 

मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी बारा प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. या छायाचित्र ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे. ही माहिती महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क संचलनालयाने दिली आहे. 

निवडणूक आयोगाने दिलेले मतदार ओळखपत्र नसेल पण मतदार यादीत नाव असेल तर पर्याय म्हणून सुचवलेल्या बारा ओळखपत्रांपैकी किमान एक सादर करुन मतदान करता येणार आहे. 

पर्यायी ओळखपत्र पुरावे

  1. आधारकार्ड
  2. मनरेगा रोजगार ओळखपत्र
  3. बँक किंवा टपालाचे फोटोसह पासबुक
  4. पारपत्र किंवा पासपोर्ट (महत्त्वाचे : अनिवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक)
  5. वाहन चालक परवाना किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
  6. पॅनकार्ड
  7. भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी दिलेले स्मार्ट कार्ड
  8. कामगार मंत्रालयाचे आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  9. केंद्र किंवा राज्य शासनाचे निवृत्ती वेतनाचे दस्तावेज
  10. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र
  11. संसद सदस्य (खासदार), विधानसभा/विधानपरिषद सदस्य (आमदार) यांचे अधिकृत ओळखपत्र
  12. भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र

सम्बन्धित सामग्री