Sunday, May 11, 2025 04:49:49 AM
20
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरमधील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराला भारतीय हल्ल्यातील पाच प्रमुख दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे.
Saturday, May 10 2025 10:30:15 PM
काही वेळापूर्वी पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतातील श्रीनगर येथे गोळीबार सुरू केल्याचे व्हिडिओ जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवरून दिले.
Saturday, May 10 2025 08:54:07 PM
हिटमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने 7 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, शनिवारी विराट कोहलीने देखील कसोटी क्रिकेटला रामराम करणार का? अशी बातमी समोर येत आहे.
Saturday, May 10 2025 08:06:49 PM
पैठणमधील दावरवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी शेतात काम करून घरी परतल्यानंतर 48 वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला.
Saturday, May 10 2025 07:30:51 PM
भारतासोबत युद्ध पुकारणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज कसे दिले? असा सवाल एआयएमआयएमचे (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.
Saturday, May 10 2025 06:54:22 PM
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एक्सवर एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये ट्रम्प म्हणाले.
Saturday, May 10 2025 05:50:40 PM
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या विनाकारण गोळीबारात 25 वर्षीय सैनिक एम. मुरली नाईक शहीद झाले. या पार्श्वभूमीवर, शनिवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाईक कुटुंबाची स्वतः भेट घेतली.
Saturday, May 10 2025 04:15:22 PM
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती शिगेला पोहोचली आहे. अशातच, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.
Saturday, May 10 2025 03:14:55 PM
काही देश भारताला पाठिंबा देत आहेत तर काही देश पाकिस्तानला खुलेआम पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे.
Saturday, May 10 2025 03:04:14 PM
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी, 'उद्या माझा वाढदिवस आहे. यावर्षी कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव साजरा करू नये', असे स्पष्ट करत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
Friday, May 09 2025 09:52:24 PM
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणामुळे गुरुवारी, जम्मू आणि काश्मीर सरकारने पुढील दोन दिवसांसाठी केंद्रशासित प्रदेशातील सर्व शैक्षणिक संस्थांना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Friday, May 09 2025 08:51:43 PM
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील चिंचाळा येथे जिल्हा सत्र न्यायालयातील एका 65 वर्षीय निवृत्त लिपिकाचा धड आणि मुंडके वेगळे करून मृतदेह विहिरीत फेकल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी उघडकीस आली.
Friday, May 09 2025 08:12:46 PM
बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' विषयी सविस्तर माहिती दिली. मात्र, काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्यातील परिस्थिती अशी अजिबात नव्हती, असं शरद पवार म्हणाले.
Friday, May 09 2025 07:23:29 PM
सरकारकडून येणाऱ्या सूचना आणि नियमांचे पालन करावे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री भुजबळ यांनी दिली. पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामुळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी भारतीय सैन्यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
Friday, May 09 2025 06:40:23 PM
पाकिस्तान येथील माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार शाहिद अहमद यांनी संसदेमध्ये पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना झापत त्यांच्या सरकारविरोधात रोष व्यक्त करत म्हणाले.
Friday, May 09 2025 06:34:13 PM
सोशल मीडियाच्या या युगात तणावपूर्ण परिस्थिती सुरू असताना कोणत्या गोष्टी शेअर कराव्यात आणि कोणत्या गोष्टींची माहिती देण्यास टाळावे.
Friday, May 09 2025 04:30:28 PM
भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
Friday, May 09 2025 03:53:27 PM
पंतप्रधान मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी राज्य सरकारने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी उचललेल्या योग्य पावलांबद्दलही विचारपूस केली.
Friday, May 09 2025 03:44:02 PM
केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी बुधवारी अचानकपणे केडीएमसीच्या रुख्मिणीबाई रुग्णालयाला दिलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
Wednesday, May 07 2025 09:14:10 PM
वरिष्ठ सरकारी वकील आणि दहशतवादविरोधी खटल्यांचे प्रमुख नेते उज्ज्वल निकम यांनी भारतीय लष्कर आणि मोदी सरकारचे मनापासून आभार मानले. त्यासोबतच, उज्ज्वल निकम म्हणाले.
Wednesday, May 07 2025 08:26:08 PM
दिन
घन्टा
मिनेट