मुंबई: महानगरांमध्ये आणि मेट्रो शहरांमध्ये प्रवासी वाहतुकीसाठी लोकप्रिय असलेल्या Ola आणि Uber चा वापर करतात पण याच कंपनींकडून ग्राहकांना भेदभाव केल्याचं एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. आयफोन आणि अँड्रॉईड फोनवरून कॅब बुकींग केल्यावर भिन्न भिन्न भाडे आकारले जात असल्याचा मुद्दा उचलला आहे. यावर केंद्र सरकारने तातडीने Ola आणि Uber कंपन्यांना नोटीस पाठवून उत्तर देण्याची मागणी केली आहे.
केंद्र सरकारच्या कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटी (CCPA) ने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, Ola आणि Uber ला विचारले आहे की, दोन्ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम्सवरून (अँड्रॉईड आणि आयफोन) एकाच प्रवासासाठी भिन्न भाडे का आकारले जातात?
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यासंदर्भात X पोस्ट केली असून, ते म्हणाले की, “ग्राहकांची पिळवणूक कदापि सहन केली जाणार नाही. ग्राहकांच्या पारदर्शक अधिकारांचा उल्लंघन होऊ नये,” अशी कठोर भूमिका घेतली आहे.कंपन्यांना CCPA कडून सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. आयफोन आणि अँड्रॉईड वापरकर्त्यांमधील भेदभावावर लक्ष ठेवून, यासंबंधी निर्णय लवकरच अपेक्षित आहे.
तुम्ही Ola किंवा Uber ने प्रवास करत असताना, ह्या भेदभावाची शिकार झाला आहात का? केंद्र सरकार आता तुमच्या हक्कासाठी निर्णायक कारवाई करत आहे!