Friday, May 16, 2025 07:36:14 AM

Split AC vs Window AC: स्प्लिट एसी की विंडो एसी? घरात वापरण्यासाठी कोणता आहे बेस्ट? जाणून घेऊ..

Which AC is best?:  वाढत्या उष्णतेमुळे जर तुम्ही नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला स्पिल्ट एसी आणि विंडो एसीमधील काही फरकांबद्दल सांगणार आहोत.

split ac vs window ac स्प्लिट एसी की विंडो एसी घरात वापरण्यासाठी कोणता आहे बेस्ट जाणून घेऊ

Split AC vs Window AC: उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या उष्णतेमुळे, बहुतेक लोक आता एसीकडे वळत आहेत आणि चांगले पर्याय शोधत आहेत. तुम्ही एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आम्ही तुम्हाला दोन प्रकारच्या एसींमधील फरक सांगणार आहोत. त्याच्या मदतीने, एसीबद्दलचा तुमचा बराचसा गोंधळ दूर होणार आहे. यातून स्प्लिट एसी विंडो एसीपेक्षा महाग का आहे, हेही स्पष्ट होईल.
नवीन एअर कंडिशनर (air conditioner) खरेदी करताना विंडो एसी आणि स्प्लिट एसी यांच्यामध्ये तुमचा गोंधळ उडालेला असेल तर, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, दोन्ही प्रकारच्या एसींपैकी कोणता एसी सर्वोत्तम आहे. खरं तर, दोन्ही एसीचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. अशा परिस्थितीत, जे पहिल्यांदाच एसी खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांना दोघांपैकी एक निवडणे खूप कठीण होऊन जाते. दोन्ही प्रकारच्या एसीमधील फरक आम्ही तुम्हाला सांगतो.

हेही वाचा - रोबो आणि AI टेक्नॉलॉजीच्या मदतीने प्रेग्नन्सी; IVF यशस्वी होऊन पहिल्या बाळाचा जन्म

स्प्लिट एसी आणि विंडोज एसीची किंमत
दोन्ही प्रकारच्या एसींमध्ये किंमत खूप महत्त्वाची भूमिका बजावते. खरंतर, विंडो एसीची किंमत खूपच कमी आहे. तर, स्प्लिट एसीची किंमत जास्त आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये एसी घ्यायचा असेल तर तुम्ही विंडो एसी घ्यावा आणि जर तुमचे बजेट जास्त असेल आणि तुम्हाला घरात कमी तोडफोड करायची असेल तर, तुम्ही स्प्लिट एसी खरेदी करू शकता.

एसी लावण्यासाठी लागणारी जागा
विंडो एसी आणि स्प्लिट एसीमधील दुसरा सर्वात मोठा फरक म्हणजे जागेची आवश्यकता. विंडोज एसीला सामान्यतः जास्त जागा लागते. तर स्प्लिट एसीला खिडक्यांपेक्षा कमी जागा लागते.

विजेचा वापर
स्प्लिट एसी आणि विंडो एसीमध्ये वीज वापर जवळजवळ सारखाच असतो. हा वीज वापर स्टार रेटिंगवर अवलंबून असतो. सिंगल स्टार (1 स्टार) एसीचा वीज वापर जास्त असतो, तर 5 स्टार एसीचा वीज वापर कमी असतो. याशिवाय इन्व्हर्टर एसीमध्येही वीज बचत होते. प्रोडक्टवरील स्टिकरवर हे स्टार दर्शवलेले असतात.

एसीतून येणारा आवाज
विंडोज एसी स्प्लिट एसीपेक्षा जास्त आवाज करतात. खरंतर, विंडो एसीमध्ये, आतील ब्लोअर आणि कॉम्प्रेसर यांचे एकच युनिट असते. तर, स्प्लिट एसीमध्ये असे नसते, त्यामुळे ते कमी आवाज करते.

कूलिंग क्षमता
एसीची क्षमता किंवा थंड करण्याची क्षमता त्याच्या टोनेजवर अवलंबून असते. स्प्लिट एसी वरच्या बाजूला बसवता येतात आणि मोठ्या जागेला थंड करण्यासाठी डिझाइन केलेले असतात, तर विंडो एसी लहान खोल्यांमध्ये चांगला थंडावा देतात.

कोणता एसी बेस्ट आहे? 
दोन्ही एसी आपापल्या ठिकाणी चांगले आहेत. जर तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये विंडो एसीसाठी जागा असेल तर, तुम्ही तो बसवू शकता. जर जागा नसेल आणि तुमच्याकडे कोणताही पर्याय नसेल तर तुम्हाला स्प्लिट एसी बसवावा लागेल. स्प्लिटचा फायदा असा आहे की, तो बसवल्यानंतर, सर्व उष्णता घराच्या किंवा ऑफिसच्या बाहेरच राहते. अशा परिस्थितीत, तुम्हाला त्याबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही.

हेही वाचा - काही Mobile Apps करताहेत बेईमानी; Uninstall केल्यानंतरही असतो डेटा चोरीचा धोका


सम्बन्धित सामग्री