Friday, May 02, 2025 10:52:42 AM

'देव तारी त्याला..' खारट रोगन जोश, घोडे उशिरा मिळाले अन् भेळपुरी.. 41 जणांनी मृत्यूला चकवलं

पहलगाममध्ये हत्याकांडाच्या ठिकाणी त्या वेळेत न पोहोचल्याने तब्बल 41 जणांचे प्राण वाचले. नशीबानं जोरदार साथ दिल्यामुळे हे सर्वजण मृत्यूपासून बालंबाल बचावले. यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.

देव तारी त्याला खारट रोगन जोश घोडे उशिरा मिळाले अन् भेळपुरी 41 जणांनी मृत्यूला चकवलं

नवी दिल्ली : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हत्याकांड घडलेल्या ठिकाणी काही ना काही कारणामुळे पोहोचू न शकल्याने तब्बल 41 जणांचे प्राण वाचले आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारातील बळींचा आकडा 28 वर पोहोचला आहे. मात्र, काही लोकांचे नशीब बलवत्तर ठरले नसते तर, यात मोठी भर पडली असती. या लोकांचं अलगदपणे मृत्यूच्या जबड्यातून वाचणं हे देशवासियांसाठी दिलासादायक आहे, असं म्हणता येईल.

रोगन जोशचे जेवण खूप खारट होणे, घोडे येण्यास उशीर आणि भेळपुरीची एक प्लेट या गोष्टींमुळे हे लोक वाचवले गेले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी 28 जणांना ठार मारले असताना, 40 हून अधिक लोकांसाठी नशिबाने कशी अशक्य वाटणारी ढाल बनवली, याबद्दलची माहिती आता समोर येत आहे.

22 एप्रिल रोजी हत्याकांडाचे ठिकाण बनलेल्या बैसरन कुरणापासून 41 जणांना नशिबाने दूर ठेवले. असे झाले नसते तर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या जास्त वाढली असती. खारट मटण रोगन जोशने केरळमधील 11 जणांच्या एका कुटुंबाला घटनास्थळापासून दूर ठेवले. तर, घोड्यांच्या कमतरतेमुळे 28 पर्यटकांना तिथे पोहोचण्यास उशीर झाला. भेळपुरीचा नाश्ता घेऊन निघून गेलेल्या एका जोडप्याने त्यांच्या 'ग्रह-ताऱ्यां'चे आभार मानले.

दहशतवाद्यांच्या एका गटाने दक्षिण काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांना लक्ष्य केले आणि 28 जणांची जागीच हत्या केली. त्यांनी हिंदूंना वेगळे करून त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांपैकी एकाचे शस्त्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका घोडेवाल्यालाही यात ठार मारण्यात आले.

हेही वाचा - 'या' मुस्लीम घोडेवाल्याचे पर्यटकांना वाचवण्यासाठी बलिदान; पळण्याऐवजी दहशतवाद्यांना आडवा आला..

'बैसरनला पोहोचण्याच्या काही मिनिटांपूर्वी माझ्या पतींनी जेवण करण्याचा आग्रह धरला'
पहलगामला जाणाऱ्या 11 सदस्यांच्या केरळ कुटुंबासाठी खारट मटण रोगन जोशची एक प्लेट तारणहार ठरली, ज्यामुळे त्यांना मृत्यूला चकवणं शक्य झालं. कोचीहून आलेले हे कुटुंब 19 एप्रिल रोजी काश्मीरमध्ये आलं आणि त्यांनी पुढील दोन दिवस गुलमर्ग आणि सोनमर्गचे सौंदर्य पाहिलं. मंगळवारी, मागील दोन दिवस दुपारी जेवायला न जाणाऱ्या कुटुंबाने बैसरन कुरणात पोहोचण्यापूर्वी फक्त 15 मिनिटे आधी जेवण करण्याचा निर्णय घेतला.

"मंगळवारी आम्ही श्रीनगरपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या पहलगामला जात होतो," असे कुटुंबातील एक स्त्री सदस्य लावण्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

"आम्ही त्या दिवशी सकाळी (मंगळवार) थोडे उशिरा निघालो. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही व्यस्त वेळापत्रकामुळे दुपारचे जेवण घेतले नव्हते. त्यामुळे माझ्या पतींनी बैसरन फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर असताना जेवण्याचा आग्रह धरला," असे त्या म्हणाल्या.

कुटुंब रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ढाबा स्टाईल रेस्टॉरंटमध्ये थांबले. परंतु, जास्त रोगन जोशचे जेवण खारट असल्यामुळे त्यांना ते खाणे शक्य झाले नाही. त्यांना जेवण आवडले नसल्याचे पाहून, ढाबावाल्याने पुन्हा स्वयंपाक बनवतो, काही वेळ थांबा असे सांगितले. ज्यामुळे त्यांना एक तास उशीर झाला.
जेवणानंतर बैसरनला प्रवास सुरू केल्यानंतर, कुटुंबाने त्यांच्या गंतव्यस्थानापासून फक्त 2 किमी अंतरावर गोंधळ पाहिला.
"घोडे मागे सरकत होते, टॅक्सी वेगाने खाली येत होत्या आणि लोक ओरडत होते - पण आम्हाला स्थानिक बोली समजत नव्हती," लावण्या यांनी सांगितले.
विचारपूस केल्यावर, कुटुंबाला सांगण्यात आले की, काही गोंधळ झाला होता आणि सुरक्षा दल घटनास्थळी होते.
त्यांच्या ड्रायव्हरने, जो स्थानिक होता, त्यांना पुढे जाण्यास सांगितले, असे सुचवले की, अशा गोष्टी तिथे सामान्य होत्या. परंतु काहीतरी गडबड असल्याचे जाणवल्याने, कुटुंबाने परत जाण्याचा निर्णय घेतला.

11 सदस्यांनी दरीतील एका तलावाजवळ काही वेळ घालवल्यानंतर, दुपारी 4.30 वाजता, काही तणाव निर्माण झाल्यामुळे दुकानदारांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले. ते त्यांच्या रिसॉर्टकडे निघाले आणि लवकरच त्यांना बैसरन कुरणात मोठा दहशतवादी हल्ला झाल्याचे फोनवरून समजले.
आता, कुटुंबाला वाटते की, ते नशीब आणि योग्य निर्णयामुळे त्यांना मृत्यूपासून वाचवले.

महाराष्ट्रातील 28 पर्यटकांसाठी घोडे लवकर न मिळाल्याने टळले मरण
महाराष्ट्रातील 28 लोकांच्या गटानेही अशीच एक योगायोगाची कहाणी सांगितली. त्यांच्या बाबतीत, घोडे उपलब्ध नसल्याने ते वाचले. हे पर्यटक कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि पुणे येथील होते. हे पर्यटक बैसरन कुरणापासून दूर राहिले. कारण, त्यांना नेमक्या वेळी सहलीसाठी घोडे उपलब्ध नव्हते.
या ठिकाणी मोटार चालविण्यायोग्य रस्ता नाही आणि लोक फक्त ट्रेकिंग किंवा घोड्यावर बसूनच तेथे पोहोचू शकतात. "आम्हाला वेळेवर घोडेस्वारी न मिळाल्यानेच आम्ही वाचलो," असे कोल्हापूरच्या गारगोटी गावातील सुरेंद्र दत्तात्रेय सपाळे यांनी सांगितले.
"जर आम्हाला उशीर झाला नसता तर आम्ही गोळीबारात सापडलो असतो," असे गटातील एका पर्यटकाने सांगितले. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना पुढे असलेल्या धोक्याची सूचना दिल्यानंतर ते लगेच मागे वळले.
"घोडे मालकांनी सुरुवातीला प्रति घोडा 3,200 रुपये मागितले होते. आम्ही 15 मिनिटे घोडे ठरवण्यात घालवली. घोड्यावर स्वार होऊन हे लोक घटनास्थळापासून फक्त 500 मीटर अंतरावर असताना आमचा ड्रायव्हर ओरडत धावत आला, 'पुढे गोळीबार सुरू आहे - जाऊ नका!," असे गटातील सदस्य अनिल कुरणे यांनी सांगितले.

हेही वाचा - Pahalgam Attack: 'मला तुझा अभिमान आहे...', विनयची पत्नी हिमांशीचा व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

शांत कोपऱ्यात भेळपुरी खात बसल्याने जयपूरचे नवविवाहित जोडपे बचावले
वृत्तानुसार, या नवविवाहितांची एकांतात भेळपुरी खाण्याची इच्छा होती. ज्यामुळे जयपूरमधील मिहिर आणि कोमल सोनी हे जोडपे वाचले.

हे नवविवाहित जोडपे पहलगाममधील बैसरन कुरणात आले होते आणि त्यांनी नाश्त्यासाठी थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काही भेळपुरी हातात घेतली आणि कुरणाच्या एका शांत कोपऱ्यात गेले.
"सर्व काही खूप शांत होते. आम्ही भेळपुरी विकत घेतली आणि एका शांत कोपऱ्यात बसून आजूबाजूच्या दृश्यात रमलो होतो. तेव्हा अचानक आम्हाला गोळीबाराचे आवाज ऐकू आले. लोक ओरडू लागले आणि पळू लागले," मिहिरने सांगितले.

अशा प्रकारे 40 हून अधिक लोक त्यांच्या नशीबाने जोरदार साथ दिल्यामुळे गोळ्यांच्या वर्षावापासून वाचले.


सम्बन्धित सामग्री