Tuesday, May 20, 2025 05:33:53 AM
20
अलिकडेच 'स्त्री 2' च्या प्रचंड यशाचा आनंद घेतलेली बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने नुकताच एकता आर कपूरच्या आगामी चित्रपटातून माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे.
Monday, May 19 2025 09:13:06 PM
कर्जबाजारीपणाला कंटाळून 65 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथे सोमवारी दुपारी 4:15 वाजता घडली आहे.
Monday, May 19 2025 08:38:13 PM
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणा राज्यातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव आहे मोहम्मद तारीफ. तावाडू येथून मोहम्मद तारीफला पोलिसांनी अटक केली आहे.
Monday, May 19 2025 07:26:52 PM
अधिकाऱ्याने स्वतःच्या पगारात 5 टक्क्यांची वाढ करून घेण्यासाठी स्वतःच्या मूल्यांकन अहवालावर अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी, शिक्का मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Monday, May 19 2025 06:42:21 PM
देशभरात भारतीय सैन्याच्या कामगिरीचा जल्लोष साजरा केला जात आहे. देशभरात सुरु असलेल्या या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.
Monday, May 19 2025 05:53:42 PM
जानेवारी ते एप्रिल 2025 या कालावधीमध्ये फक्त मुंबई आणि उपनगरांमधील एकूण 525 रुग्णांना 4 कोटी 95 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रदान करण्यात आली आहे.
Monday, May 19 2025 05:05:23 PM
ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना माहिती पुरवल्याचा आरोप आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्या प्रकरणी ज्योती मल्होत्राचे इंस्टाग्राम अकाउंट निलंबित केले.
Monday, May 19 2025 03:46:20 PM
छत्रपती संभाजीनगर ते लातूर या मार्गावर जाणाऱ्या कारचा टायर फुटल्यामुळे कार उलटली. या अपघातात दोन वर्षांच्या चिमुकल्यासह त्याची आई जागीच ठार झाली, तर चौघेजण गंभीर जखमी झाले.
Monday, May 19 2025 03:34:04 PM
2006 मध्ये नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्याचा कट रचणारा धोकादायक दहशतवादी अबू सैफुल्लाह पाकिस्तानात ठार झाला आहे.
Sunday, May 18 2025 09:03:41 PM
शुक्रवारी संध्याकाळी परळी येथे शिवराज दिवटे या तरुणाला बेदम मारहाण केली. रविवारी, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी पीडित शिवराज दिवटेची भेट घेत त्याच्या प्रकृतीची चौकशी केली.
Sunday, May 18 2025 07:37:45 PM
परळी येथील टोकवाडी परिसरात शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण करण्याची घटना घडली होती. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पीडित शिवराज दिवटेला भेट दिली.
Sunday, May 18 2025 06:34:58 PM
आपल्या उत्कृष्ट नृत्यकौशल्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांचा मुलगा अरिन नेने आता पदवीधर झाला आहे.
Sunday, May 18 2025 05:31:34 PM
तब्बल 5 वर्षांनंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. माहितीनुसार, हा प्रवास जूनपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sunday, May 18 2025 04:48:33 PM
देशातील सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'संसदरत्न पुरस्कार 2025' सोहळ्याचे वितरण करण्यात आले आहे. यंदा देशातील 17 खासदारांना 'संसदरत्न पुरस्कार 2025' जाहीर करण्यात आला आहे.
Sunday, May 18 2025 03:39:04 PM
रविवारी, इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे. मतदारांसोबत संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, 'ज्यांच्याकडे साखर कारखाना चालवण्याची धमक आहे, तुम्ही त्यांनाच मतदान करा'.
Sunday, May 18 2025 03:25:39 PM
शरद पवार यांनी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात तपास यंत्रणांचा राजकीय हेतूंसाठी वापर आणि ईडीने विरोधकांवरील कारवाईवर भाष्य केले.
Saturday, May 17 2025 09:37:34 PM
ज्येष्ठ कवी आणि लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. यादरम्यान, जावेद अख्तर यांनी अनेक माहिती दिली. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
Saturday, May 17 2025 08:34:47 PM
आज सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांनी आजची सत्ता उद्या गेल्यावर आपले काय होईल हे विसरू नये, असा इशारा आमदार रोहित पवारांनी गोरेंना दिला आहे. यावर, मंत्री जयकुमार गोरेंनी आमदार रोहित पवारांना टोला लगावला आहे.
Saturday, May 17 2025 07:22:27 PM
वकील असीम सरोदे सध्या लंडनमध्ये आहेत. लंडनच्या दौऱ्यावर असताना त्यांनी लंडनमधील अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्यूझियमला भेट दिली. यादरम्यान, त्यांनी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर आरोप केला आहे.
Saturday, May 17 2025 07:04:14 PM
शनिवारी, शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदारांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. 'ईडीकडून अटक होण्यापूर्वी मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता.
Saturday, May 17 2025 03:43:23 PM
दिन
घन्टा
मिनेट