Monday, July 07, 2025 05:22:56 AM
20
डेटिंग अॅप्सद्वारे मुली मुलांना महागड्या हॉटेल्समध्ये घेऊन जातात. त्यानंतर, खाण्या-पिण्याचे हजारो रुपयांचे बिल बनवले जातात. न घेतलेल्या गोष्टी देखील या बिलमध्ये लावल्या जातात.
Sunday, July 06 2025 09:25:25 PM
उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी ही नोटीस बजावली आहे.
Sunday, July 06 2025 08:42:41 PM
रविवारी पहाटे 2:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली. यंदा, फडणवीसांना सहाव्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाला.
Sunday, July 06 2025 07:42:39 PM
शाळेतील भिंत पाडल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 4 जुलै रोजी माटोरा येथील प्रशांत विद्यालयात घडला.
Sunday, July 06 2025 06:39:19 PM
पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये काही विद्यार्थ्यांनी कोयत्याने आणि हातोड्याने मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. या घटनेत 2 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Sunday, July 06 2025 05:58:06 PM
उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका केली. त्यानंतर, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेंना एक पत्र लिहिले.
Sunday, July 06 2025 05:00:51 PM
आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं पंढरपूरची वारी. या एकादशीचे एक विशेष महत्व आहे. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो.
Sunday, July 06 2025 03:29:17 PM
नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक भरती घोटाळ्यासंदर्भात आमदार संदीप जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी माहिती दिली.
Saturday, July 05 2025 09:17:54 PM
कोरिओग्राफर फराह खान तिच्या यूट्यूब चॅनेलवर स्वयंपाकाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. अलिकडेच कॉमेडियन मुनावर फारुकी तिच्या घरी आला होता.
Saturday, July 05 2025 08:17:01 PM
'विजयी सोहळा हा सोहळा नव्हता तर रडगाणं होतं', ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. 'आमचं हिंदुत्त्व सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे.
Saturday, July 05 2025 08:05:34 PM
जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये भारतातील 'या' राष्ट्रीय उद्यानात जाण्याचा विचार करत असाल तर तेव्हा भारतातील काही राष्ट्रीय उद्याने बंद राहतात.
Saturday, July 05 2025 05:49:54 PM
शनिवारी वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे ठाकरे बंधूंचा भव्य विजय मेळावा पार पडला. या कार्यक्रमानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली.
Saturday, July 05 2025 03:59:17 PM
सुप्रिया सुळेंनी पुढाकार घेत अमित ठाकरेंना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आणि आदित्य ठाकरेंना राज ठाकरे यांच्या बाजूला उभं केलं. यावेळी, आदित्य आणि अमित ठाकरेंनी व्यासपीठावर पुढे येत हातात हात मिळवला.
Saturday, July 05 2025 03:37:13 PM
शेअर मार्केटमधील उद्योजक सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट करून राज ठाकरेंना डिवचलं, 'मी 30 वर्षांपासून मुंबईत राहतो, पण मला मराठी येत नाही, बोल क्या करना है?', असा सवाल केडिया यांनी उपस्थित केला.
Friday, July 04 2025 09:29:17 PM
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती यांचा मुलगा सूर्य सेतुपती याने 'फिनिक्स' या त्याच्या पहिल्या चित्रपटातून मुख्य नायक म्हणून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे.
Friday, July 04 2025 08:50:40 PM
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीवरील बलात्कार झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी महत्वाची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
Friday, July 04 2025 07:10:11 PM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'वन बिग ब्युटीफुल बिल' अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर झाले आहे. यावर एक नवीन वाद सुरू झाला आहे.
Friday, July 04 2025 06:51:28 PM
भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे यांनी गुजरातचा उल्लेख केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला. अशातच, शीतल म्हात्रे यांनी शुक्रवारी इंस्टाग्रामवर उद्धव ठाकरेंच्या 'जय गुजरात' घोषणेचा जुना व्हिडिओ शेअर केला.
Friday, July 04 2025 05:20:49 PM
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण शिगेला पोहोचले असताना, अलीकडेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
Friday, July 04 2025 04:29:35 PM
राज्यात सर्वत्र ठाकरे बंधूंची चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन शनिवारी विजयी रॅलीचे आयोजन केले आहे. वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे शनिवारी विजयी मेळावा होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
Friday, July 04 2025 03:20:14 PM
दिन
घन्टा
मिनेट